माझ्याबद्दल

राजकारण, समाजकारण, सां‍स्कृतिक तथा क्रीडाविश्‍व मी माझ्या लहानपणापासूनच जळवून पाहिलं आहे. माझे बाबा आरणीय आर. सी. पाटील यांच्याकडे महाराष्ट्रातले खूप मोठमोठे नेते येत असत. चर्चा करत असत. मी हा राजकीय सारीपाट फार पूर्वीपासून अनुभवलाय. वडिलांनी एक गोष्ट आमच्यावर फार प्रभावीपणे बिंबवली, ती म्हणजे शिक्षण. आज मी वकील आहे, माझी एक बहिण डॉक्टर आहे. शिक्षणामुळे समाजविकासाची कवाडे उघडण्यास खूप मत होते.

मी प्रभाग क्र. ५२ मधून निवडून आले तेव्हा इतरांना जो आनंद होतो तसा तो मलाही झाला होता. त्या आनंदाने मला नेहमीच जागृत ठेवलं. जबाबारी वाढली असल्याचं भान वेळोवेळी करून दिलं. माझे सासरे स्व. जनार्दन गौरी तसेच पती सुनिल गौरी दीर नरेश गौरी, अविनाश साळवी यांनी माझ्या राजकीय सामाजिक जडणघडणीत मोलाचा सहभाग र्शवला म्हणूनच मी एक एक पाऊल पुढे टाकत आहे.

मी आज स्व. आनं दिघे साहेब ॠण व्यक्त करते आहे. त्यांच्याकडे मी १९९७ साली गेले होते. स्वीकृत सदस्य पदासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यावेळी दिघे साहेब म्हणाले, अनिताताई, तुम्ही आता कॉंग्रेसमध्ये आहात. पुढच्या टर्मला शिवसेनेत या आणि नगरसेविका व्हा. माझं नगरसेवकपद पहायला आज साहेब नाहीत याची मनाला खंत वाटते. आपलं काहीतरी हरवलंय याचा भास होतो. असो... आज प्रभाग क्र. ५२ चा चार वर्षातील कार्याचा आढावा घेणारा माझा कार्यअहवाल जनतेच्या हाती देताना मला नक्कीच आनंद होतोय. हा आनंद ग्रामदेवता हिरादेवी माता तसेच माझे स्व. बंधु किशोर पाटील आशीर्वादामुळे मिळाला.  या प्रभाग ५२ ची इतकी दुरवस्था होती की क्षणाक्षणाला लोक तक्रारी घेऊन माझ्याकडे येत राहिले व मी त्या तक्रारींचं निवारण करत गेले. अजून खूप योजना आहेत. त्या प्रत्यक्षात राबवायच्या आहेत. जनतेच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे त्रण व्यक्त करून माझे मनोगत पूर्ण करते.